बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी गुरुवारी बेंगळूरच्या कोविड केअर सेंटरमधील ३०६ कोरोना रुग्णांना दिवसाअखेरपर्यंत डिस्चार्ज दिला जाणार आहे. हे सर्व कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
बेंगळूरमध्ये ११ कोविड केअर सेंटरवर ४,२७६ बेड आहेत. आज सकाळ पर्यंत, त्यापैकी ९३६ म्हणजेच, २७. ७९ टक्के बेड रिक्त आहेत, असे मंत्री सुधाकर यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ३३४६ रुग्णांपैकी ३०६ रुग्णांना आज डिस्चार्ज देणार असल्याचे म्हंटले आहे.