प्रतिनिधी / सांगली
बेकायदेशीरपणे चौकाचौकात उभारण्यात आलेले होर्डींगस हटविण्याची कारवाई महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. शहराच्या सौन्दर्याचे विद्रुपीकरण होत असल्याने कारवाईचा बडगा उगरण्यात येत असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. दरम्यान यापुढे शहरात बेकायदेशीर होर्डिंग्ज दिसल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराही कापडणीस यांनी दिला आहे.