7 लाख 49 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात
बांदा/ प्रतिनिधी-
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या कारचा सुमारे 6 किलोमीटर थरारक पाठलाग करून कारवाई केली. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने बांदा ते ओटवणे पाठलाग करून पहाटे साडे चार वाजता केली.या कारवाईत 2 लाख 49 हजार 700 रुपयाची दारू व 5 लाख किमतीची कार( एम एच 07 एजी 9006 ) असा एकूण 7 लाख 49 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर याप्रकरणी तुषार विनायक तुळसकर(वय 23 ,रा न्यू खासकीलवाडा गावडेशेत) व यशवंत चंद्रकांत करिवडेकर (वय.23,रा. हरिजनवाडा कारीवडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.हि कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गचे अधीक्षक बी एच तडवी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस एस साळवे, दुय्यय निरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, सुहास वरुटे, जवान सर्वश्री गुरव, अमर पाटील, विशाल भोई, रवींद्र सोनवणे, शिवाजी जाधव यांनी केली. अधिक तपास दुय्यय निरीक्षक जितेंद्र पवार करीत आहेत.दोन्ही संशयितांना न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली.