१७ लाखाचा मुद्देमाल ताब्यात
बांदा/ प्रतिनिधी-
गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या तुळजापूर येथील आयशर टेम्पोवर कोल्हापूर पथकाने फोंडा कणकवली मार्गावर फोंडा येथे कारवाई केली. या कारवाईत 10 लाख 69 हजार 440 रुपयाची दारू व 7 लाख किमतीचा (एमएच07 सी5312) असा एकूण 17 लाख किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर या प्रकरणी हसन पापा शेख (रा.तुळजापूर )यास ताब्यात घेतले. हि कारवाई कोल्हापूर पथकाचे निरीक्षक एस एस साळवे,उपनिरीक्षक जितेंद्र पवार,कुमार कोळी, सुहास वरुटे, सर्वश्री गुरुव, दीपक कापसे, मंगेश कर्पे, रवी सोनवणे यांनी केली.