पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रातील प्रकार
प्रतिनिधी / पर्वरी
पेन्ह द फ्रान्स पंचायतक्षेत्रातील प्रभाग क्र. 8 मध्ये मासळी बाजाराच्या बाजूला असलेल्या सर्व्हे नं. 179 येथील जागेत पंचायतीतर्फे करत असलेल्या बांधकामास गोवा गृहनिर्माण मंडळाने गंभीर दखल घेतली असून याविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती मंडळातील सूत्रांनी दिली आहे.
गोवा गृहनिर्माण मंडळाच्या मालकीच्या सर्व्हे नं. 179 मधील 3770 चौ. मी. खुल्या जाग्sढवर पेन्ह द फ्रान्स पंचायतीने बांधकाम सुरू करण्यापूर्वी ‘ना हरकत’ दाखला किंवा कायदेशीर लेखी काही न कळविता जागेला संरक्षक कठडय़ाचे बांधकाम केले. तसेच जेसीबी यंत्राद्वारे जमीन खणून काम सुरू केले. याबद्दल मडंळाच्या कार्यालयात माहिती मिळताच संबंधित मंडळाच्या अधिकऱयांनी बेकायदा बांधकामाची पाहणी करून पंचनामा करून पुढील सोपस्कार करण्याबाबत पावले उचलली आहेत, अशी माहिती गृहनिर्माण मंडळाच्या सूत्रांनी दिली.
सुमारे 3770 चौ.मी खुल्या जागेसंबंधी गृहनिर्माण मंडळाकडे कोणताच पत्रव्यवहार न करता संरपंचांनी आपल्या अधिकारात घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे, असे एका अधिकाऱयाने सांगितले. या प्रकरणी गृहनिर्माण मडळ निर्णय घेणार आहे.
या संदर्भात पेन्ह द फ्रान्स पंचायतीचे संरपंच स्वप्निल चोडणकर यांच्याशी भ्रमणध्dवनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. तसेच पंचायत कार्यालयात भेट घेऊन प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते कार्यालयात उपलब्ध नव्हते. सर्व्हे नं. 179 मध्ये चालू असलेले बांधकाम पंचायतीच्या पुढाकारात सुरू असल्याची माहिती पंचायतीच्या सूत्रांनी दिली, मात्र अधिक तपशील मिळू शकला नाही.
पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रातील विविध ठिकाणी असलेल्या कोमुनिदादच्या खुल्या जागेवर पंचायतीने बांधकामे केली आहेत. ही बांधकामे कायदेशीर आहेत की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. बांधंकाम केलेल्या कामाची निगा राखण्याची जबाबदारी पंचायतीने घेतली आहे. पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी ही विविध कामे पंचायतीने हाती घेतली आहे. परंतु सरकारकडून या प्रकल्पाची निगा राखण्यासाठी कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही, अशी माहिती पंचायत सूत्रांनी दिली. यात नाना-नानी पार्क आर्ट गॅलरी, सायन्स पार्क यांचा समावेश आहे.
… तर पंचायतीवर कोण कारवाई करणार?
एखादा नागरिक बांधकाम करताना संबंधित पंचायतीच्या अटींची पूर्तता न केल्यास पंचायतीतर्फे नोटीस बजावली जाते. परंतु दुसऱयाच्या जमिनीत खुद्द पंचायतीनेच बेकायदा बांधंकाम सुरू केले तर पंचायतीवर कोण कारवाई करणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात असून हा मुद्दा सध्या पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.