प्रतिनिधी/ म्हापसा
कोलवाळ पोलिसांनी थिवीतील ‘लाला की बस्ती’ येथे भाडेकरू तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेवेळी 50 हून अधिक लोकांची चौकशी करण्यात करून यातील सात जणांना अटक केली आहे. उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सोमनाथ माजीक यांच्या पोलीस पथकांनी ही कारवाई केली.
आवचीतवाडा-थिवी येथे असलेल्या लाला की बस्तीत शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून ही मोहिम हाती घेण्यात आली होती. मोहिमे दरम्यान तिथे भाडय़ाने राहणाऱया सुमारे 60 हून जास्त भाडेकरुंनी आपली रितसर नोंदणी केली नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांना 24 तासांच्या आत नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. अधीक्षक निधीन वाल्सन तसेच उपअधिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आली.
या शोध मोहिमेदरम्यान काहीजण संशयास्पदरित्या निवास करीत असल्याचेही आढळून आले आहे. त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रेही नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. चंदन कुमार गोड सिंकदर इंटर अली, मिरज अहमद अर्षद हुसेन, तौसूर हुसैन, अनिल सिंग आणि किशन गुप्ता अशी त्यांची नावे असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.
पोलिसांकडून प्रत्येक घराघरात जाऊन भाडेतत्वावर राहणाऱयांची पडताळणी करण्यात येत आहे. यानुसार भाडेकरू म्हणून नोंदणी न केलेल्या तसेच योग्य कागदपत्रे सादर न केलेल्यांना पोलीस स्थानकावर आणून त्यांची चौकशी केली जात आहे. सदर भागातील हॉटेल इतर व्यावसायिक घर मालक कंत्राटदारांना 24 तासाच्या आत नोंदणी करून घेण्याचे आदेशही देण्यात आले.