मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माजी सभागृहनेता सुरेश पाटील यांची मागणी
मुख्यमंत्र्यांना तक्रारीचे लिहले 18 पानी पत्र
सोलापुर / प्रतिनिधी
त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी सोलापुर महापालिकेत उपायुक्त म्हणुन कार्यरत असताना महापालिकेची प्रतिमा मलिन, नियमबाह्य कामकाज केले. अनेक भ्रष्टाचार केले, त्यामूळे त्यांना पुन्हा सोलापुर महापालिकेत नियुक्ती देऊ नये, असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माजी सभागृहनेता तथा नगरसेवक सुरेश पाटील यांनी बुधवारी पाठवले असुन त्यांची नियुकी न करण्याची मागणी केली आहे.
माजी सभागृहनेता तथा नगरसेवक सुरेश पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, उपायुक्त पदावर काम करणारे अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील हे मुख्यअधिकारी दर्जाचे अधिकारी असुन त्यांची आजपर्यंतची संपुर्ण सेवा छोट्या-छोट्या नगरपरिषधेमध्ये झालेली आहे. त्यामुळे त्यांना मोठ-मोठ्या महानगरपालिकेचा अनुभव नसल्याने ढेंगळे-पाटील यांनी कक्षेबाहेर जावुन अत्यंत बेकायदेशिर व नियमबाह्य कामकाज केले आहे. महानगरपालिकेमध्ये कामकाज करतेवेळी महानगरपालिका अधिनियमाप्रमाणे काम करावे लागते. परंतू उपायुक्त पदावर काम करतेवेळी उपायुक्त पदाच्या अधिकार कक्षा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात दिलेल्या आहेत. तरी देखील त्यांना कामाचा अनुभव नसल्याने व त्यांची अकलन क्षमता अंत्यत कमी असल्याने अमिषाला बळी पडुन मोठ्य प्रमाणात बेकायदेशिर कृत्य केले आहेत.
बार्शी नगरपरिषदेमध्ये कार्यरत असताना तेथील समाजसेवकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्याने त्यांना मिडटर्म बदली करुन हाकलुन दिले. जी.आय.एस सर्वे करणाऱ्या सायबर टेक कंपनीकडुन लाखो रुपये खावुन दिरंघाई केल्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. एल.बी.टी. विभागामध्ये करोडो रुपयांच्या वसुलिमध्ये संगनमताने उपायुक्तांनी भ्रष्टाचार करुन करोडो रुपयांची एल.बी.टी वसुल न करता दिरंघाई करुन व्यापारांच्या बाजुने कामकाज केले, असे आरोप माजी सभागृहनेता सुरेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात केले आहेत.