प्रतिनिधी / शिरोळ
बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी हरोली (ता. शिरोळ) येथे रोहन सुभाष खोत (वय २०, रा. माणगाववाडी, ता. हातकणंगले)याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल शिरोळ पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे असे असताना संशयीत खोत दारु विकत असल्याची माहिती मिळाली सहा पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर सानप पोलीस नाईक हनुमंत माळी पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला यांनी नांदणी हरोली दरम्यान खोत हा मोटर सायकल वरून दारू बेकायदेशीर गावठी दारू विक्रीसाठी घेऊन जात असताना त्याला रंगेहात पकडले.
त्याच्याकडून दहा हजार रुपये किंमतीचे दारु व ५० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल असा साठ हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला. याबाबतची फिर्याद पो कॉ. गजानन कोष्टी यांनी दिली. अधिक तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत.