बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. तसेच राज्यात बऱ्याच ठिकाणी कोरोना चाचणी अहवाल वेळेत मिळत नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यास उशीर होत आहे. यातच दोन खासगी रुग्णालयांनी पाठवलेल्या बेबनाव नमुन्यांची बेकायदेशीररीत्या चाचणी केल्याच्या आरोपावरून येळहांका पोलिसांनी नुकतीच एका सरकारी रुग्णालयातील तीन प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांना आणि खासगी क्लिनिक चालवत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली.
यामध्ये कोडीगेहळ्ळी येथील साई प्रिया क्लिनिक व प्रयोगशाळेचे मालक सतीश कुमार आणि येळहांका सरकारी रुग्णालयातील पद्मनाभ, बावी रेड्डी आणि पुनीत कुमार अशी अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सतीश कुमार हे तिन्ही प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांकडे गेले होते. त्यांनी क्लिनिकमधून गोळा केलेले लॅब नमुने तसेच येळहांका येथील मारुतीनगर येथील स्टँडर्ड लॅबवर तपासणी केली.