ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन – गल्लो-गल्ली काँक्रिटचा रस्ता होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेकिनकेरे गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. व्यासपीठावर एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, ता. पं. सदस्या मलप्रभा गावडे, ग्रा. पं. सदस्या लक्ष्मी गावडू गावडे, छब्बुताई कांबळे, मारुती बेळगावकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तालुका पंचायतच्या फंडातून गावातील रस्त्यांचा विकास साधला जाणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते गावातील सर्व गल्ल्यांमध्ये होणाऱया नवीन काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, गावातील सर्व गल्लीत काँक्रिटचे रस्ते होणार आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचा विकास करणे, हे एकच ध्येय ठेऊन विकासकामे सुरू आहेत. जनतेचेदेखील सहकार्य मिळत असून येत्या दिवसात ध्येय साध्य होणार आहे.
याप्रसंगी ग्रा. पं. माजी अध्यक्ष मल्लाप्पा गावडे, नारायण सावंत, ग्रा. पं. माजी सदस्य नागेश बाळेकुंद्री, गजानन मोरे, नारायण बाळेकुंद्री, कल्लाप्पा कडोलकर, नारायण मोरे, मारुती खादरवाडकर, अरुण गावडे, जयवंत सावंत, नारायण भडांगे, बाळू यळ्ळूरकर, कल्लाप्पा भातकांडे, सुरेश ढेकोळकर, इराप्पा गावडे, रमेश शिंदोळकर, बाळू भातकांडे, प्रभू गावडे, नामदेव पाटील, विलास कुऱयाळकर, कल्लाप्पा शिंदोळकर, कल्लाप्पा भोगण, भाऊ भोगण यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.