बेळगाव / प्रतिनिधी
कोरोना काळात बेकिनकेरे येथील डॉक्टरांनी रुग्णांची अखंडपणे सेवा केली आहे. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्मयात घालून आरोग्यसेवा पुरविणाऱया डॉ. निरंजन कदम, डॉ. विवेक सावंत यांचा ग्रामस्थांनी कोरोना योद्धे म्हणून सत्कार केला.
कोरोनाशी लढा देताना गावातील डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा केली. याची दखल घेत ग्रामस्थांनी डॉ. निरंजन कदम व डॉ. विवेक सांवत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. कोरोना काळात आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, पोलीस, सफाई कर्मचारी यांनी कोरोना योद्धे म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आहे. अशा कोरोना योद्धय़ांचा गौरव होणे गरजेचे असल्याचे विचार ग्रा. पं. माजी सदस्य गजानन मोरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी पीडीओ स्मिता चंदरगी, ग्रा. पं. माजी सदस्य लक्ष्मण गडगाणे, नागेश बाळेकुंद्री, गजानन मोरे, लक्ष्मी मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जयवंत सावंत, कल्लाप्पा भातकांडे, हभप शिवाजी बसरीकट्टी यासह ग्रामस्थ उपस्थित होते.