बेळगाव / प्रतिनिधी
नवीन वर्षात शुक्रवारपासून दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग सुरू केले. या पार्श्वभूमीवर बेकिनकेरे येथील ग्राम पंचायतीतर्फे येथील प्राथमिक मराठी व कन्नड शाळा व हायस्कूलमध्ये सॅनिटायझरची फवारणी करून वर्ग खोल्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या.
कोरोना महामारीमुळे मागील नऊ महिन्यापासून बंद असणाऱया दहावी, बारावी, महाविद्यालये सुरू करण्याला शासनाने परवानगी दिली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्राम पंचायतीकडून शाळेच्या वर्गखोल्या व परिसरात सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.