बेळगाव / प्रतिनिधी
बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिराचा तिसरा वर्धापन दिन शुक्रवारी उत्साहात पार पडला. कोरोना व आचारसंहितेच्या नियमांचे पालन करत हा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने पहाटे मंदिरात गावातील ज्ञानेश्वरी व ज्योतिर्लिंग भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.
सकाळी मंदिरात नुकताच लष्करातून निवृत्त झालेले माजी सैनिक कुमार सातेरी, सपंत भडांगे, चंद्रकांत गावडे, राजू गावडे, मनोरामा नौखंडकर, यल्लाप्पा बिर्जे, यल्लाप्पा मोरे, भरमा भोगण यासह उद्योजक मारुती खादरवाडकर आदींच्या हस्ते अभिषेक व विधिवत पूजन झाले. होमपूजन व काकडआरती नागनाथ देवस्थान कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत झाले. नागनाथ मूर्ती पूजन व तुळस पूजन निवृत्त शिक्षक जोतिबा भोगण यांच्या हस्ते झाले.
वर्धापन दिनानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करून मंदिर सजविण्यात आले होते. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी वर्दळ वाढली होती. या दोन दिवसीय कार्यक्रमाची तीर्थप्रसादाने सांगता झाली. याप्रसंगी नागनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा भोगण, सदस्य अर्जुन डोंबले, यल्लाप्पा गावडे, आनंद धायगोंडे, मल्लाप्पा गावडे, सुरेश सावंत, परशराम भातकांडे, पुंडलिक भडांगे, मल्लाप्पा महागावकर यांसह गावातील युवक मंडळे, महिला, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.