प्रतिनिधी/ बेळगाव
बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिरात रविवारी दसरा उत्सव साधेपणाने पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर सकाळपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. मोजक्मयाच्या भाविकांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. कोरोनाचे नियम व सामाजिक अंतर पाळून मंदिरात धार्मिक विधी पारंपारिक पध्दतीने पार पडल्या.
यानिमित्ताने शेतकऱयांनी पारंपारिक पद्धतीने आपल्या बैलांना सजवून मंदिराकडे आणले होते. तसेच वाहने देखील पुजेसाठी मंदिर परिसरात आणली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱयाच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱयांनी बैलांना सजवून झूल बांधून पूजेसाठी मंदिराकडे आणले होते. कोरोनामुळे यंदाचा दसरात्सव मर्यादित स्वरूपात व गावपातळीवर पार पडल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
सकाळी गावातून ढोल-ताशाच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी पालखीचे प्रस्थान नागनाथ मंदिराकडे झाले. घटस्थापनेपासून सुरु झालेल्या दुर्गामाता दौडची यावेळी जल्लोषात आणि मोजक्मयाच धारकऱयांच्या उपस्थित सांगता करण्यात आली.
यावेळी गावातील नागनाथ गल्ली, लक्ष्मी गल्ली, गवळी गल्ली, गणपत गल्ली, ज्योतिर्लिंग गल्ली, मारुती गल्ली, ज्ञानेश्वरनगर परिसरात पालखी फिरवण्यात आली. पालखी मार्गावर सुवासिनींनी पंचाआरती ओवाळून औक्षण केले. यावेळी नागनाथ देवस्थान कमिटीचे सदस्य, तरूण, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.