आठ महिन्यांची असताना मृत आईच्या सोबत सापडली होती कार्तिकी
प्रतिनिधी / मिरज
मिरज येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे अनोखा विवाह संपन्न झाला. मिरजेतील बेघर निवारा केंद्र मधील कार्तिकी आणि अजयचा सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पडला. पंढरपूर येथे एका निर्जनस्थळी आठ महिन्यांची असताना मृत आईच्या सोबत कार्तिकी सापडली होती. आई मृत झाल्याने बेघर निवारा केंद्राने तिचा सांभाळ केला. रेणुका शिशिगृह, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान आणि बेघर महिला निवारा केंद्र असा प्रवास असणारी कार्तिकी आज विवाह बंधनात अडकली.
न्यू इंग्लिश स्कुलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने हा सत्यशोधक विवाह संपन्न झाला. डॉ. विनोद परमशेट्टी, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी या विवाहासाठी संपूर्ण तयारी केली. मुंबई येथे खाजगी संस्थेत काम करणाऱ्या अजय सोबत तिचा पुढील संसार असणार आहे.