नवी दिल्ली
सिडनी मैदानावरील काही मूठभर चाहत्यांकडून झालेली वर्णभेदी आगळीक हा बेजबाबदार वर्तणुकीचा कळस आहे, अशी तीव्र प्रतिक्रीया मायदेशी परतलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिली आहे. या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची त्याने मागणी केली आहे. विराटलाही यापूर्वी वर्णभेदी शेरेबाजीचा सामना करावा लागला आहे. 2011-12 मधील कसोटी मालिकेत याच मैदानावर झालेल्या सामन्यात त्याला हा अनुभव आला होता. ‘.वांशिक शेरेबाजी कदापिही सहन केली जाणार नाही. सिडनीमध्ये अनेकदा हा प्रकार घडला आहे. मात्र या सामन्यावेळी झालेली आगळीक म्हणजे बेजबाबदारपणाचा कळसच होता. असे प्रकार मैदानात होताहेत याचे दुःख वाटते,’ असे कोहलीने ट्विटच्या माध्यमातून सांगितले.