फोर्ब्जच्या ताज्या यादीत बेजोस यांनी आघाडीचे स्थान गमावले
नवी दिल्ली
ऍमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेजोस यांना सध्या मोठा झटका बसला आहे. फोर्ब्जने सोमवारी जारी केलेल्या नव्या यादीत बर्नार्ड अरनॉल्ट यांनी सर्वात श्रीमंत व्यक्ति होण्याचा मान मिळवला आहे. तर जेफ बेजोस हे दुसऱया नंबरवर राहिले आहेत.
फोर्ब्जच्या नव्या यादीत बेजोस यांना मागे टाकत अरनॉल्ट यांनी पहिले स्थान प्राप्त केले असून 186.4 अब्ज डॉलर्सची संपत्ती प्राप्त केली आहे. तर दुसऱया नंबरवरील बेजोस यांनी 186 अब्ज डॉलर्सची संपत्ती प्राप्त केली आहे.
कोण आहेत बर्नार्ड
फ्रान्समधील तिसऱया क्रमांकांचे मोठे शहर रुबेक्समध्ये बर्नार्ड अरनॉल्ट यांचा जन्म झाला आहे. फ्रान्समधील सुप्रसिद्ध फॅशन ब्रँड लुइस वुटन आणि सेफोरा (एलव्हीएमएच) चे ते सर्वेसर्वा आहेत. 2021 पर्यंत त्यांनी आपल्या संपत्ती मूल्यात 47 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे. त्यांचे 70 विविध ब्रँडस् सर्वदूर व्यवसाय करत आहेत. ख्रिस्टीयन डीओय यामध्ये 96 टक्के हिस्सा काबीज केला आहे. एलव्हीएमएच यांनी यावर्षी जानेवारीत अमेरिकेतील टिफनी अँड कंपनीचे 15.8 अब्ज डॉलर्स मोजून अधिग्रहण केले आहे.