रडून मन मोकळे करण्याची सुविधा
तुम्ही घरात बेडरुम, लिव्हिंग रुमबद्दल ऐकले असेलच पण कधी क्राइंग रुमबद्दल ऐकले आहे का? स्पेनमध्ये लोकांना ताणमुक्त करण्यासाठी क्राइंग रुम तयार करण्यात आली आहे. या रुममध्ये जाऊन लोक मनसोक्त रडत आहेत.
या क्राइंग रुममध्ये ‘मला देखील तुमची चिंता आहे’ अशा प्रकारचे फलक लावले असून ते गुलाबी रंगात चमकत असतात. या विशेष खोलीत एका कोपऱयात अशा लोकांच्या नावाचे फोन आहेत, ज्यांना तुम्ही उदास वाटल्यावर कॉल करू शकतात, यात मनोचिकित्सक आणि डॉक्टर देखील सामील आहे.
मध्य माद्रिदमध्ये एका इमारतीत तयार करण्यात आलेल्या या कक्षात कुणीही सामील होऊ शकतो. याचा उद्देश मानसिक आरोग्याने पीडित लोकांना या समस्येतून बाहेर काढणे आहे. मदत मागण्यापासून त्यांचा संकोच दूर करणे देखील याचा उद्देश आहे.
मानसिक आरोग्याच्या मुद्दय़ाची कल्पना करणे प्रत्यक्षात एक उत्कृष्ट विचार आहे. स्पेनमध्येही अन्य देशांप्रमाणे रडणे चुकीचे मानले जात असल्याची माहिती माद्रिद येथे राहणारा स्वीडिश विद्यार्थी जॉन नेल्सम याने म्हटले आहे.
एका आठवडय़ापूर्वी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी 100 दशलक्ष युरोंच्या (116 दशलक्ष डॉलर्स) मानसिक आरोग्य मोहिमेची घोषणा केली आहे. यात 24 तास आत्महत्याविरोधी हेल्पलाइन यासारख्या सेवा आणि सुविधा देखील सामील असतील. स्पेनमध्ये क्राइंग रुमचा उद्देश मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या दूर करणे आहे.
मानिसक आजार ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या असून त्याबद्दल आम्ही बोलणे गरजेचे असून तोडगा काढला जावा असे सांचेझ यांनी म्हटले आहे. 2019 मध्ये स्पेनममध्ये 3,671 जणांनी आत्महत्या केली होती. हे प्रमाण नैसर्गिक मृत्यूनंतरचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. सरकारी आकडेवरीनुसार तेथील 10 किशोरवयीनांपैकी एकाला मानसिक आरोग्याची समस्या आहे.