साहित्य : कोफ्ताः 4 ब्रेड स्लाईस, 2 कांदे चिरून, 2 हिरव्या मिरच्या चिरून, 1 चमचा दही, चिमुटभर खाण्याचा सोडा, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, मीठ, तेल तळण्यासाठी, भातः 1 वाटी बासमती तांदूळ, 1 तमालपत्र, छोटा तुकडा दालचिनी, 2 वेलची, 2 लवंग, मीठ, ग्रेव्हीः 3 चमचे तेल, छोटा दालचिनी तुकडा, 2 लवंग, अर्धी वाटी कांदा चिरून, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखटपूड, 1 चमचा धणे-जिरेपूड, पाव चमचा हळदपूड, अर्धी वाटी टोमॅटो चिरून, मीठ, अर्धी वाटी दही, पाव वाटी मटार वाफवून, दही मिश्रणः पाव वाटी दही, 2 चमचे पुदिना, 2 चमचे कोथिंबीर, मीठ
कृती : ब्रेडचे तुकडे करून त्यात इतर साहित्य व पाणी मिक्स करून गोळे करावेत. तयार गोळे गरम तेलात तळावेत. तांदूळ 15 मिनिटे भिजत घालून नंतर भात तयार करावा. ग्रेव्हीसाठी गरम तेलात दालचिनी, लवंग टाकावे. नंतर त्यात कांदा गुलाबी रंगावर परतवावा. आता आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणेजिरेपूड, हळद टाकून परतवावे. नंतर टोमॅटो टाकून शिजवावा. नंतर मटार टाकावेत. दही मिश्रण बाऊलमध्ये मिक्स करावे. आता भांडय़ात आधी भात, त्यावर ग्रेव्ही, नंतर मधेमधे बेड कोफ्ता घालावे. वरून दही मिश्रण घालून दोन मिनिटे गरम करून खाण्यास द्या.