प्रतिनिधी /पणजी
श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा न्यास बेती बार्देस या संस्थेच्यावतीने श्री स्वामी समर्थ मंदिराचा शीलान्यास सोहळा नुकताच श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधीश श्री श्री 108 महंत परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुंडईकर, पेन्हा द फ्रान्स पंचायतीचे सरपंच स्वप्नील चोडणकर यांच्या उपस्थितीत झाला होता.
आज या मंदिराचे काम पूर्णत्वाच्या वाटेने चालले आहे आणि याची पाहणी नुकतीच सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांनी केली. हे स्वामींचे मंदिर गोव्याच्या पुण्यभूमीतील प्रति अक्कलकोट ठरणार आहे. या स्वामी समर्थ मंदिरासाठी हजारो भाविक भक्तगणांचे हात पुढे आलेले आहेत. वाळकेश्वरवाडा बेती या ठिकाणी होत असलेल्या मंदिरासाठी स्वर्गीय शंभू व्यंकटेश नाईक मीरसंगकर यांच्या स्मरणार्थ नाईक मीरसंगकर कुटुंबीयांनी ही जागा विनामूल्य संस्थेला दान दिलेली आहे. सर्व गोमंतकियाच्या सहकार्याने या मंदिराचे काम युद्धपातळीवर चालू आहे. या स्वामी मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे हे स्वामी समर्थ मंदिर संपूर्णपणे पाषाणी दगडाने रेखा शास्त्रानुसार बनविण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आरसीसी बांधकाम व लोखंड वापरण्यात आलेले नाही. हे मंदिर संपूर्णपणे हातानी नक्षीकाम केलेल्या असून नक्षीकाम करणारे कारागीर यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या मंदिरामध्ये स्थापन होणारी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती 1500 किलो वजनाची नऊ धातूपासून बनवण्यात येत आहे. या गाभाऱयामध्ये कुठल्याही प्रकारची लाईट न वापरता नंदादीप किंवा लामण दिवे याद्वारे प्रकाशयोजना तयार करण्यात आलेली आहे .
मंदिर स्थापनेसाठी श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा न्यास ही संस्था अविरत कार्य करीत असून आज गोवामध्ये संस्थेच्यावतीने पाच उपासना केंद्र चालू आहेत या उपासनाच्या माध्यमातून सर्व भाविक भक्तांच्या व्यथा अडचणी दूर होऊन त्यांना मनशांती, सुख समाधान व जीवनाचा मार्ग मिळतो. संस्थेचे संस्थापक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु श्री गावडेकाका महाराज निःशुल्क आणि निःस्वार्थीपणे भाविकांना मार्गदर्शन करतात.
अंधश्रद्धा, बुवाबाजी, भोंदूगिरी यांच्या आहारी न जाता स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून कार्य केल्यास जीवनामध्ये सुख समाधान आणि मनशांती नक्कीच मिळेल, असा संदेश ते नेहमी देतात. सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ श्रद्धा फक्त सेवा न्यास ही संस्था नेहमी समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, कॅन्सरसारख्या आजाराने असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत तरुण, तरुण पिढीसाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम असे आणि यासारखे अनेक समाज सेवा प्रकल्प संस्था राबवत आहे. संस्थेने हाती घेतलेला स्वामी समर्थ मंदिराच्या भव्य दिव्य कार्यामध्ये कोणाला आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात दान द्यायचे असल्यास पुढील ठिकाणी संपर्क साधावा
बँक तपशील पुढीलप्रमाण
SHREE SWAMI SAMARTH SHRADDHA BHAKT SEVA NYAS.
- CANARA BANK
- PORVORIM BARDEZ GOA
- A/C – 120001023655
- IFSC- CNRB0002862
- 9623827560
- 9420162810