वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी कर्णधार आणि जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांची येथील सिटी हॉस्पिटलमधून शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. 74 वर्षीय बेदी यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया गेल्या महिन्यात करण्यात आली होती.
गेल्या महिन्यात बेदी यांना छातीतमध्ये वेदना होऊ लागल्याने त्यांना लागलीच येथील सर गंगाराम हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर बेदी यांना तीन आठवडय़ांच्या कालावधीसाठी येथील सिटी हॉस्पिटमध्ये ठेवण्यात आले होते. बेदी यांच्या प्रकृतीमध्ये झपाटय़ाने सुधारणा होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. 1967 ते 1979 या कालावधीत बेदी यांनी 67 कसोटी आणि 10 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे 266 आणि 7 बळी मिळविले आहेत.