11 जुगाऱयांना अटक, 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त, ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बेनकनहळ्ळी येथील जुगारी अड्डय़ावर धाड टाकून 11 जुगाऱयांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
राजू रामा साके (रा. गुड्सशेड रोड), नसीर सुबानसाब लाबी (रा. श्रीनगर), गणेश अरुण मुतगेकर (रा. शहापूर), प्रमोद मनोज पाटील (रा. शहापूर), प्रफुल्ल बाळकृष्ण पाटील (रा. शाहूनगर), बाबू जोतिबा बेळगावकर (रा. हिंडलगा), शिराज अहम्मद शहापुरे (रा. भडकल गल्ली), किरण विष्णू तोराटे (रा. भरतनगर, शहापूर), राजू मष्णू सरोळकर (रा. चंदगड), परमेश बाबू तळवार (रा. खासबाग), हिदायतउल्ला कासीम मकानदार (रा. चंदगड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बेळगाव ग्रामीण पोलिसांना बेनकनहळ्ळी येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली. त्या ठिकाणी 11 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील रक्कम आणि 11 मोबाईल, चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.