मुंबई :
आरामदायी लक्झरी गटात मोडणारी बेनेली इम्पीरीयल 400 ही मोटारसायकल आता 5 हजार रुपयांच्या इएमआयवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. बेनेलीने ही खास ऑफर नुकतीच जाहीर केली आहे. बेनेली इम्पीरीयल 400 ही मोटारसायकल बीएस- 6 प्रणालीची असून कंपनी या गाडी खरेदीवर सर्वात कमी इएमआय (समान मासिक हप्ता) आकारत आहे. या गाडीच्या किमतीत मध्यंतरी 20 हजार रुपयेपर्यंत वाढ झाली आहे. गाडी खरेदीवर 85 टक्के इतके कर्ज ग्राहकाला मिळू शकणार आहे. या गाडीच्या बुकिंग करता 6 हजार रुपये ग्राहकांना आगाऊ भरावे लागणार आहेत. 374 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन या गाडीला असून राऊंड हेड लॅम्प, टीयर ड्रॉप टँक अशा काही सुविधा या गाडीत असणार आहेत. सिल्वर, ब्लॅक आणि रेड या तीन रंगांमध्ये ही गाडी रेट्रो डिझाइनसह उपलब्ध आहे. ही गाडी रॉयल इनफिल्ड 350शी टक्कर देईल. या गाडीची किंमत 1.69 लाख (एक्स शोरूम) रुपये इतकी आहे.