डरहॅम / वृत्तसंस्था
इंग्लंडमधील डरहॅम क्लबने अष्टपैलू बेन स्टोक्सशी आणखी 3 वर्षांचा करार केला असल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली. 30 वर्षीय बेन स्टोक्स 2011 मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर सातत्याने इंग्लिश संघात समाविष्ट रहात आला आहे. स्टोक्सने यापूर्वी 2010 मध्ये इसेक्सविरुद्ध डरहॅम कौंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण नोंदवले. त्याने कौंटीमध्ये 64 सामने खेळले असून 3611 प्रथमश्रेणी धावा केल्या. त्याची लँकेशायरविरुद्ध 185 ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. स्टोक्सने याशिवाय, इंग्लंडतर्फे 71 कसोटी सामने खेळले असून यात 37.04 च्या सरासरीने 4631 धावा केल्या. शिवाय, 163 बळीही घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हेडिंग्ले कसोटीत नाबाद 135 ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली.