वार्ताहर /सावईवेरे
कणकवाडा-सावईवेरे येथील वासुदेव उर्फ नरेश व्यंकटी नाईक (60) या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह पेटेर-सावईवेरे येथे जुवारी नदीच्या पात्रात तरंगताना आढळून आला. सदर इसम रविवारी रात्रीपासून बेपत्ता होता. सोमवारी सकाळी त्यासंबंधी तक्रार फोंडा पोलिसांत नोंदविण्यात आली होती.
पाण्यात बुडून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. नरेश हा रविवारपासून बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरु होता. मंगळवारी सकाळी नदीच्या पात्रात तरंगताना त्याचा मृतदेह आढळून आला. अग्नीशामक दलाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मयत नरेश याच्यापश्चात पत्नी, दोन मुलगे, बहीण असा परिवार आहे.