कामे वाटपाला विरोध, नव्याने मिटींग घेण्याची मागणी
प्रतिनिधी / मिरज
शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू केलेली काम वाटप मिटींग सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी बंद पाडली. सांगली जिल्ह्यात हजारो सुशिक्षित बेरोजगार अभियंते नोंदणीकृत असताना फक्त एकच काम देऊन बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे पुन्हा नव्या कामांचा समावेश करुन मिटींग घ्यावी, अशी मागणी संतप्त झालेल्या बेरोजगार अभियंत्यांनी केली.
केवळ मिटींग घेण्याचा सोपास्कर पार पाडून बेरोजगार अभियंत्यांच्या तोंडाला पाने पोसण्याचा प्रयत्न सुरू आहे. डझनभर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केवळ एकच कामाच्या वाटपासाठी मिटींग घेऊन खलबते करणे योग्य नाही. त्यामुळे जास्तीत जास्त बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने नव्या कामांचा समावेश करावा आणि मगच मिटींग घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.