वृत्तसंस्था/ बेलग्रेड
एटीपी टूरवरील शनिवारी येथे झालेल्या बेलग्रेड खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या टॉप सीडेड नोव्हॅक जोकोविचने एकेरीचे जेतेपद पटकाविताना स्लोव्हाकियाच्या मॉलकेनचा पराभव केला.
मायदेशात झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात जोकोविचने मॉलकेनवर 6-4, 6-3 अशा सेटस्मध्ये मात करत अजिंक्यपद पटकाविले. गेल्या फेब्रुवारीमध्ये जोकोविचने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर जोकोविचचे हे दुसरे विजेतेपद आहे. जोकोविच आता रविवारपासून सुरू झालेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.