माँट्रियल : डब्ल्यूटीए टूरवरील माँट्रियल खुल्या हार्डकोर्ट महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या टॉप सीडेड साबालेन्काने एकेरीची तिसरी फेरी गाठताना स्टिफेन्सचा पराभव केला.
बुधवारी झालेल्या महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात तृतीय मानांकित साबालेन्काने स्लोअन स्टिफेन्सचा 7-6 (7-4), 4-6, 6-4 असा पराभव केला. अडीच तास चाललेल्या सामन्यात साबालेन्काने 18 तर स्टिफेन्सने 11 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. दुसऱया एका सामन्यात ग्रीकच्या सॅकेरीने कुड्रेमेटोव्हाचा 6-4, 5-7, 6-4 तसेच कॅनडाच्या 30 वर्षीय मॅरिनोने स्पेनच्या बेडोसाचा 1-6, 7-5, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.