काकती पोलीस स्थानकात एफआयआर
बेळगाव : बेल्लदबागेवाडी (ता. हुक्केरी) येथील एक तरुणी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. तिच्या वडिलांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
प्रीती गौतम पदाप्पगोळ (वय 27) असे तिचे नाव आहे. प्रीती भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठात शिक्षण घेत आहे. एका कार्यक्रमानिमित्त दि 12 मार्च रोजी दुपारी ती विद्यापीठात आली होती. मात्र कार्यक्रम संपवून ती घरी परतलीच नाही. तेंव्हापासूनच ती बेपत्ता झाली आहे.
दि. 14 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता कुटुंबीयांना फोन करुन आपण लग्न केले आहे. त्यामुळे घरी येणार नाही, असे सांगून फोन ठेवून दिली. मात्र त्यानंतर तिचा फोनही स्वीचऑफ आहे. काकती पोलीस या तरुणीचा शोध घेत आहेत.