थंडीचा जोर वाढतोय : ग्रामीण भागात शेकोटय़ा पेटू लागल्या : हिवाळय़ात कोरोना वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गायब झालेली थंडी आता दोन दिवसांपासून पुन्हा वाढली आहे. बेळगाव तालुक्मयात थंडी वाढली असून पारा आता कमाल तापमान 29.04 तर किमान तपमान 14.5 अंशांवर येऊन ठेपला आहे. थंडीत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. याचा परिणाम पिकांवर काही प्रमाणात झाला. सध्या बेळगावचा पारा घटत असून यावषी अधिक प्रमाणात थंडी पडणार असे अनुमान हवामान खात्याने वर्तविले आहे. थंडी वाढल्याने ग्रामीण भागात शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत.
बेळगाव शहर आणि उपनगरात थंडीने जोर केला आहे. आता वातावरण बदलत असून थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना उबदार कपडे परिधान करावे लागत आहेत. काही तज्ञांनी यावषी हिवाळय़ात कोरोनाचे प्रमाण वाढण्याची शक्मयता वर्तविली आहे. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाने जेरीस आणले होते. मात्र, आता पावसाळी वातावरण जावून थंडी पडू लागली आहे.
मागील चार दिवसांपासून बोचऱया थंडीला सुरुवात झाली होती. बुधवारपासून बेळगावचा पारा घसरला आहे. यावषी पावसाने उसंतच घेतली नाही. पाऊस कधी जाणार आणि थंडी कधी पडणार याकडे साऱयांचे लक्ष लागले होते. ऑक्टोबरचे तापमान ओसरल्यानंतर एकदम गारवा निर्माण होतो. यामुळे नागरिकांच्या आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यातच कोरोना महामारीमुळे अनेक जण हैराण झाले आहेत. सरकार पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या प्रयत्नात असून जर थंडी कमी झाली तरच कोरोना आटोक्मयात येण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
संपूर्ण देशात कोरोनामुळे भयावह परिस्थिती आहे. आता यातून बरे होण्यासाठी नागरिक सज्ज होत असताना थंडी पडू लागली आहे. अनेक ठिकाणी शेतीची कामे जोरदार सुरू झाली आहेत. मळणी, भात कापणी यासह इतर कामात शेतकरी गुंतला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत हवामानात वारंवार बदल झालेत. यामुळे विशेषकरून सर्दी, ताप, खोकला झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.
बेळगाव तालुक्मयात अनेक ठिकाणी शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. याचबरोबर शेतामध्येही शेकोटी करून अनेक जण थंडीपासून बचावण्याचा प्रयत्न करतानाचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण उबदार कपडे खरेदी करण्याकडे वळले आहेत. बेळगाव शहर आणि परिसरात पारा ओसरत असून तो 14.5 अंशांवर आला आहे.