प्रतिनिधी/ बेळगाव
‘स्वस्थ भारत-समृद्ध भारत’ या अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी बेळगावचा युवक 800 कि.मी.चा सायकल प्रवास करणार आहे. बेळगाव-बेंगळूर- धर्मावरम-अनंतपूरम असा हा प्रवास असणार आहे. 17 वषीय शुभम नारायण साखे हा युवक रविवार दि. 6 पासून या सायकल प्रवासाला निघणार आहे.
शुभम हा बसवण कुडची येथील भरतेश पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. रविवारी सकाळी 7 वा. गोवावेस सर्कल येथून या प्रवासाला सुरुवात होणार आहे. बेंगळूर येथे 7 दिवस तो प्रचार व प्रसाराचे काम करणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला आंध्रप्रदेश येथील अनंतपूरम येथे पोहोचणार आहे.