बेळगावच्या सांबरा विमानतळावरून बेंगळूर, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, म्हैसूर, तिरूपती व इंदोर या शहरांना सेवा सुरू आहेत. दररोज शेकडो प्रवासी या मार्गांवर प्रवास करीत आहेत. स्टार एअर, इंडिगो, स्पाईस जेट, अलायन्स एअर व आता ट्रुजेटनेही आपली सेवा बेळगावमधून सुरू केली आहे. त्यामुळे बेळगावबरोबरच आसपासच्या शहरांमधील नागरिकांना या विमानसेवेचा फायदा होत आहे. त्यातच यातील 10 मार्ग हे केंद्रसरकारच्या उडान- 3 योजनेंतर्गत समावेश झाल्यामुळे कमी दरात प्रवास करणे शक्मय झाले आहे.
सुशांत कुरंगी