क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना व जीएसडब्ल्यू बेंगळूर फुटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळूर येथे बेळगावच्या 3 खेळाडूंची निवड झाली आहे. चाचणीसाठी ध्रुव नाईक, चैतन्य नाईक, आर्यवर्धन काकडे यांच्याशी पाच वर्षाचा करार करण्यात आला आहे. कर्नाटक फुटबॉल संघटनेने फुटबॉलपटूंची निवड चाचणी बेंगळूर फुटबॉल स्टेडियमवर आयोजित केली होती. त्यात 75 हून अधिक फुटबॉलपटूंनी भाग घेतला होता. त्यातून ध्रुव नाईक, चैतन्य नाईक, आर्यवर्धन काकडे यह बेळगावच्या 3 फुटबॉलपटूंची निवड करण्यात आली आहे. या तिन्ही खेळाडूंशी 5 वर्षासाठी फुटबॉल प्रशिक्षण व शिक्षण देण्याचा करार केला आहे. या निवडीनंतर या तिन्ही खेळाडूंचा बालिका आदर्श येथील बिटा क्लब येथे बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी व बिटा स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱयांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, सचिव अमित पाटील, पॅट्रॉन राम हदगल, सौरभ बिर्जे आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष पंढरी परब, राम हदगल व अमित पाटील यांनी या खेळाडूंना शुभेच्छा देऊन संघटनेतर्फे अशा गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. होतकरू फुटबॉलपटूंनी या संधीचा लाभा घ्यावा, असे सांगितले. यावेळी बालिका आदर्शचे मुख्याध्यापक एन. ओ. डोनकरी, क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर, पालकवर्ग उपस्थित होता.