प्रतिनिधी/कोल्हापूर
बेळगावमधील एक प्रसिद्ध साहित्यिक कोल्हापूरातील त्याच्या कोरोना पॉझिटिव्ह नातेवाईकांच्या संपर्कात आले आहेत. त्यांच्या संपर्कात बेळगावातील कोणी आले असतील त्यांची चौकशी करावी, असे पत्र कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्तांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱयांना पाठविले आहे.
आपल्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर बेळगावाचे प्रसिद्ध साहित्यिक अंत्यसंस्कारासाठी कोल्हापुरात आले होते. या साहित्यिकांचे दोन भाऊ आणि भावजय यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तिघांच्या संपर्कात आलेले साहित्यिक बेळगावला परतले आहेत. त्यामुळे ते कोरोनाच्या हायरिस्कमध्ये आहेत. त्यांच्यासह ते ज्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, असे कोल्हापुरच्या आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे.