प्रतिनिधी/ बेळगाव
सय्यद मुस्ताकअली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी कर्नाटक टी-20 संघाची घोषणा करण्यात आली. बेळगावचा रोहन कदम व रोनित मोरे यांचा या संघात समावेश आहे.
सय्यद मुस्ताकअली चषक टी-20 स्पर्धा 4 जानेवारीपासून सुरू होत आहे. 25 जानेवारीपर्यंत प्राथमिक फेरी झाल्यानंतर 26 तारखेपासून बाद फेरी होणार आहे. कर्नाटक संघाच्या कर्णधारपदी करूण नायरची निवड करण्यात आली असून देवदूत पडिक्कल, रोहन कदम (बेळगाव), पवन देशपांडे (उपकर्णधार), सिद्धार्थ के. व्ही., श्रीजीत के. एल., सिद्धार्थ बी. आर. (दोघेही यष्टीरक्षक), अनिरूद्ध जोशी, श्रेयस गोपाळ, गौतम के., सूचित जे., प्रविण दुबे, अभिमन्यू मिथुन, प्रसिद्ध कृष्णा, प्रतिक जैन, कौशिक व्ही., रोनित मोरे (बेळगाव), दर्शन एम. बी., मनोज बांडगी, शुभांग हेगडे यांची या संघात निवड करण्यात आली आहे.