प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या अनेक दशकांपासून कापड उद्योगात आणि खास करून साडी व्यवसायात विश्वास, गुणवत्ता, दर्जा, योग्य दर व उत्तम ग्राहक सेवा यामुळे स्वतःच्या नावाचा वेगळा ठसा उमटवलेल्या ‘हेडा कुटुंबीयांच्याकडून ‘राजगणपती सिल्क’ या नव्या दालनाची सुरुवात झाली आहे.
लग्न, साखरपुडा, स्वागत समारंभ किंवा इतर खास प्रसंगांसाठी सिल्क साडय़ांची खरेदी करायची असली की बेळगाव-गोवा भागातील अनेक कुटुंबे सिल्कच्या साडय़ा निवडण्यासाठी चेन्नई, कांचीपुरम, म्हैसूर, बेंगळूर अशा ठिकाणी जातात आणि आपल्या मनपसंत साडय़ा खरेदी करतात. ग्राहकांची ही आवड लक्षात घेऊन हेडा बंधूंनी राजगणपती सिल्कमध्ये उच्च दर्जाच्या रेशमी साडय़ांची विस्तृत श्रेणी सादर केली आहे. ज्यामध्ये फॅशन उद्योगात झपाटय़ाने बदलत असलेल्या ट्रेंडसह उच्च दर्जाच्या रेशमी साडय़ांची विस्तृत श्रेणी पाहायला मिळते.
एखाद्या मंदिरात प्रवेश करीत आहोत अशी अनुभूती देणाऱया व अनोख्या पद्धतीने सुशोभीत केलेल्या या चार मजली भव्य दालनामध्ये आपण मालाचा दर्जा, विविधता आणि किमती पाहून मंत्रमुग्ध व्हाल. या दालनात तळमजल्यावर दैनंदिन वापराच्या आणि आहेरासाठी दिल्या जाणाऱया सर्व प्रकारच्या साडय़ांचा समावेश आहे. पहिल्या मजल्यावर फक्त सिल्क साडय़ा, दुसऱया मजल्यावर खास कांजीवरम,बनारसी व लग्नाच्या साडय़ा जिथे प्युअर जरीच्या आणि अति उत्तम दर्जाच्या साडय़ा मिळतील. या मजल्यावर असलेल्या प्रिमियम स्टुडिओमध्ये आपल्याला एक वेगळेपण जाणवेल. तिसरा मजला जो आहे त्यामध्ये पुरुषांसाठी लागणाऱया उत्तम श्रेणीच्या सुट, शेरवानी, जोधपुरी, कुर्ता पायजमा, जाकेटसच्या नवनवीन व्हरायटीज आपल्याला उपलब्ध होतील. वधुवरांना लागणारे सर्व काही पोशाख देणारी ही शोरुम फक्त बेळगाव जिल्हय़ातील नव्हे तर संपूर्ण उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र व गोवा येथील ग्राहकांची आवड पूर्ण करेल असा विश्वास आहे. म्हणूनच खडेबाजार शहापूर येथे असलेल्या गणपती मंदिराच्या शेजारी वसलेल्या या राजगणपती सिल्क या वातानुकूलित दालनला आपण अवश्य भेट द्यावी, अशी विनंती संचालकांनी केली आहे.
मालाच्या किमतीबद्दलही काळजी करण्याची गरज नाही. कारण हेडा उद्योग समूह अनेक दशकांपासून कपडय़ांच्या उच्च गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असून राजगणपती सिल्कमध्ये योग्य दरच आकारले जातात. तेव्हा तुमच्या लग्नसमारंभाच्या तसेच इतर सर्व महत्त्वाच्या शुभकार्याच्या कपडय़ांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.