साडेतीन वर्षांपूर्वी अहमदाबादच्या तरुणाकडून 27 लाखाची फसवणूक : मुंबईत आवळल्या मुसक्मया
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या व्यावसायिकाला 27 लाख रुपयांना गंडविणाऱया अहमदाबाद येथील एका तरुणाला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल साडेतीन वर्षांनंतर त्याला अटक करण्यात आली असून या तरुणाने देशभरातील अनेकांना गंडविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
आदित्य कनोदिया (वय 27) मूळचा रा. अहमदाबाद-गुजरात, सध्या रा. मुंबई असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर 26 डिसेंबर 2017 रोजी येथील माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला होता. ऑटोनगर येथील कलमेश्वर सिद्धप्पा कुरीबागी या व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून आदित्यसह तिघा जणांवर एफआयआर दाखल केला होता.
आदित्य हा हायटेक इंडस्ट्रीज नामक कंपनी चालवतो. त्याने ई-मेलच्या माध्यमातून कलमेश्वर कुरीबागी यांच्याशी संपर्क साधून गनमेटल व कॉपर कास्टींग पाठविण्याची मागणी केली. 12 मे 2017 पासून हा व्यवहार सुरू होता. कलमेश्वर हे मूळचे मुधोळ तालुक्मयातील समीरवाडीचे. ऑटोनगर येथे ते एक कारखाना चालवितात. आदित्य व त्याचा व्यवस्थापक मनीष पटेल, पर्चेस ऑफीसर के. पी. शिवदास यांच्या सांगण्यावरून कलमेश्वर यांनी 27 लाख 31 हजार 668 रुपये किमतीचा माल पाठविला. माल पोहोचल्यानंतर 30 दिवसांत पैसे देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आदित्य व त्याच्या साथीदारांनी पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली.
प्रत्यक्षात 29 लाख 32 हजार 980 रुपयांचा माल पाठविण्यात आला होता. त्यापैकी 2 लाख 1 हजार 332 रुपयांचा धनादेश पाठविण्यात आला होता. वारंवार विचारणा करूनही पैसे देण्यास टाळाटाळ चालविली
होती.
आपण फसलो गेलो, हे लक्षात येताच कलमेश्वर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून आदित्य व त्याच्या साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, ते सापडले नव्हते. अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र कलादगी व शंकर कुगटोळी यांनी मुंबईला जाऊन आदित्यच्या मुसक्मया आवळून बेळगावला आणले आहे. माळमारुती पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.