क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
हुबळी येथे महिलांच्या निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत बेळगावची दहा वर्षीय महिला खेळाडू श्रेया पोटे हिने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर महत्त्वाचे तीन गडी बाद करून आपल्या ब्ल्यू संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन आजच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ग्रीन संघाने सकाळी नाणेफेक जिंकून 25 षटकात 8 गडी बाद 144 धावा केल्या. अबिता शेखने 48 व भूमिका हिने 38 धावा केल्या. ब्ल्यूतर्फे गोलंदाजी करताना श्रेया हिने 13 धावात 3 तर संध्याने 11 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्ल्यू संघाने 21.5 षटकात 8 गडी बाद 145 धावा करून सामना दोन गडय़ांनी जिंकला. ब्ल्यू संघाच्या बिंदू एस. ने 40 धावा केल्या. ग्रीनतर्फे रिमीजा शेख हिने 15 धावात 4 गडी बाद केले.