प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सैन्यदलातर्फे गौरव
बहाद्दरवाडी
राणी चन्नम्मानगर-बेळगाव येथील एका मेजर सुभेदाराची कॅप्टनपदी नियुक्ती झाली आहे. प्रकाश केशव झेंडे असे त्यांचे नाव असून बेंगळूर येथे त्यांचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलातील वरि÷ अधिकाऱयांच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे. या सैनिकामुळे बेळगावचे नाव उंचावले आहे.
देशसेवेसाठी केलेले साहस, त्याग व कर्तव्यनि÷ा यामुळे त्यांची कॅप्टनपदी नियुक्ती झाली असून त्यांच्याकडे रितसर कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देण्यात येणार आहे.
प्रकाश झेंडे यांचे मूळगाव सडेगुडवळे (ता. चंदगड) हे आहे. गेल्या 50 वर्षांपासून ते राणी चन्नम्मानगर बेळगाव येथे राहतात. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. प्रकाश झेंडे यांना बालपणापासूनच सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची आवड होती. प्रचंड इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न केला.
वडील केशव झेंडे हे निवृत्त सैनिक होते. माझ्या वडिलांनी देशसेवा केली आहे. आपणही ती करावी, अशी आस प्रकाश यांच्या मनात होती आणि वडिलांच्या कार्यामुळे प्रेरित होऊन त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचे ठरविले. वयाच्या अठराव्या वषी ते बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री येथून भरती झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मेजर सुभेदारपदापर्यंत मजल मारली. प्रारंभी श्रीलंका येथे सेवा बजावली. लडाख, पंजाब, मणिपूर, जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.
2016 पासून बेंगळूर येथे सेवा बजावत आहेत. त्यांचे साहस व कर्तृत्व पाहून सैन्यदलाच्यावतीने त्यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त गौरव करण्यात येणार आहे. ही बेळगावकरवासियांसाठी कौतुकाची बाब आहे.