क्रिडा प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आयोजित 23 वर्षाखालील आंतरमोफेशियल राज्यस्तरीय आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगावच्या 6 खेळाडूंची धारवाड विभागीय संघात निवड करण्यात आली आहे.
गतवर्षी झालेल्या धारवाड विभागीय ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर धारवाड विभागीय निवड समितीने बेळगाव जिल्हय़ाच्या सहा खेळाडूंची केएससीए आंतरमोफेशियल चषक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. अंगदराज हित्तलमनी, पार्थ पाटील, अमर घाळी, आकाश कटांबळे (सर्व बेळगाव स्पोर्ट्स क्लब), रोहित पाटील (आनंद अकादमी), वैष्णव संघमित्र (युनियन जिमखाना) अशी निवड झालेल्यांची नावे आहेत. या स्पर्धेतील कामगिरीवरून राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड करण्यात येणार आहे.