प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव विमानतळावर शनिवारी पहिल्यांदाच 180 आसन क्षमता असणारी एअर बस उतरणार आहे. इंडिगो कंपनीचे ए-320 हे विमान शनिवारी बेळगावमध्ये दाखल होत आहे. यामुळे बेळगाव विमानतळावर पहिल्यांदाच इतके मोठे विमान उतरण्यात येणार आहे. बेळगाव ते चेन्नई व बेळगाव ते हैदराबाद या दोन मार्गावर ही एअर बस जाणार आहे. या उड्डाणामुळे भविष्यात बेळगावला एअर बस मिळण्याची शक्मयताही वर्तविली जात आहे.
2017-18 मध्ये बेळगाव विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले होते. यावेळी मोठी विमाने उतरतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु तेव्हापासून अद्याप एअर बस किंवा बोईंग विमान याठिकाणी उतरले नव्हते. यापूर्वी लहान विमानांमधून बेळगावमधील विमान वाहतूक सुरू होती. त्यामुळे शनिवारी प्रथमच एअर बस बेळगाव विमानतळावर उतरणार आहे.
इंडिगोचे विमान काही प्रवाशांना घेऊन चेन्नई येथून बेळगावला येणार आहे तर आणखी एक इंडिगोचे विमान बेंगळूर येथून येणार असून ते हैदराबादला जाणार आहे. दोन्ही विमाने एकाच दिवशी बेळगाव विमानतळावर येणार आहेत. तसेच यातील काही मार्गावर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. हे एक नॉन शेडय़ल विमान असल्याची माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली आहे.