30 डिसेंबरपर्यंत दहा दिवस चालणार : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाया हिवाळी अधिवेशनासाठी मुहूर्त निशात झाला आहे. 19 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत 10 दिवस बेळगावाया सुवर्णसौध येथे विधिमंडळो अधिवेशन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांया अध्यक्षतेखाली गावारी बेंगळूरमध्ये राज्य मंत्रिमंडळी बैठक झाली. यावेळी विधिमंडळाया हिवाळी अधिवेशनासाठी तारीख निशात करण्यासह अनेक महत्त्वो निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी निर्णयीं माहिती दिली. बेळगावमध्ये अधिवेशन घेण्यासाठी सर्व प्रकारी तयारी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रायबाग, मुडलगी तालुक्यांना कृष्णेतून पाणी
धारवाड-हल्याळ मार्गावर अंडरपास निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याकरिता 41 कोटी रु. र्खा केले जातील. बेळगाव जिल्हय़ातील रायबाग आणि मुडलगी, बागलकोट जिल्हय़ात रबकवी-बनहट्टी तालुका कार्यक्षेत्रात एकूण 21 खेडय़ांना कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेमुळे रायबाग तालुक्यातील 6 गावांना, मुडलगी तालुक्यातील 4 गावांना आणि रबकवी-बनहट्टी तालुक्यातील 11 गावांना पाणीपुरवठा होणार आहे. कृष्णा नदीतील अतिरिक्त पाणी खरीप हंगामात दोन-तीन महिने कालव्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे अवर्षण भागातील शेतकऱयांना अनुकूल होणार आहे, अशी माहिती मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
क-ड श्रेणी सरकारी कर्माऱयीं आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी
क आणि ड श्रेणी सरकारी कर्माऱयीं पती-पत्नी प्रकरणांमध्ये आंतरजिल्हा बदल्यांना मंत्रिमंडळाने संमती दर्शविली आहे. काही खात्यांमध्ये पती-पत्नी आंतरजिल्हा बदली करण्यी मुभा नव्हती. नेमणूक झालेल्या ठिकाणी किमान 7 वर्षे काम करावे, असा नियम होता. त्यामुळे बदल्यांया नियमामध्ये दास्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढविणार
राज्यातील 100 प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविण्यास मंत्रिमंडळाने संमती दर्शविली आहे. अलिकडा 43 प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविण्यात आला आहे. ईएसआय हॉस्पिटलना 40 कोटी रुपये र्खी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
बेंगळूराया मल्लेश्वरम येथील के. सी. जनरल हॉस्पिटलमध्ये ट्रामा केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. त्याप्रमाणे रामनगर येथे राजीव गांधी आरोग्य विद्यापीठी इमारत उभी करण्यास 600 कोटी रुपये मंजूर केले जातील. गोकाक येथे 200 बेड्स क्षमतो माता-शिशूचिकित्सालय निर्माण केले जाईल. लिंगसगूर, हरिहर येथे प्रत्येकी 50 बेड क्षमतो माता आणि शिशू चिकित्सालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.