उशिरा निर्णय जाहीर झाल्याने मूर्तिकार अडचणीत : मंडळांनीही भार उचलण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रशासनाने कोरोनाचे कारण दाखवत यावषी गणेशमूर्तींच्या उंचीबाबत निर्बंध घातले. यामुळे गणेशोत्सव मंडळाने लहान मूर्तींची प्रति÷ापना केली होते. परंतु मूर्तिकारांनी 3 ते 4 महिन्यांपूर्वीच सार्वजनिक गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. त्यामुळे या मूर्ती कार्यशाळांमध्ये तशाच आहेत. या मूर्ती आता मूर्तिकारांना वर्षभर सांभाळाव्या लागणार आहेत. भाडय़ाच्या शेडमध्ये या मूर्ती असल्यामुळे वर्षभर नाहक आर्थिक फटका मूर्तिकारांना बसणार असल्यामुळे मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत.
गणेशमूर्तींच्या उंचीबाबत गणेश चतुर्थीच्या अवघे आठ दिवस आधी प्रशासनाने निर्णय जाहीर केला. त्यामुळे मंडळांनी मोठय़ा मूर्ती तशाच ठेवून लहान मूर्तींची प्रति÷ापना केली. बेळगाव परिसरात अशा 30 मूर्ती सध्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे या मूर्ती आता वर्षभर मूर्तिकारांना सांभाळाव्या लागणार आहेत. गणेशोत्सवानंतर हे मूर्तिकार इतर कामे करत असतात. परंतु गणेशमूर्तींमुळे कार्यशाळांमध्ये जागाच नसल्याचे दिसत आहे. मंडळांनीही पुढील वषी या मूर्ती घेण्याचे सांगितले असले तरी वर्षभराचे भाडे कोण देणार? असा प्रश्न मूर्तिकारांसमोर आहे.
आम्ही प्रशासनाचे ऐकले, आता आमचे ऐकावे
महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाबाबत वेळीच नियमावली जाहीर केली होती. त्यामुळे तेथील मूर्तिकारांनी मोठय़ा गणेशमूर्ती तयार केल्या नाहीत. परंतु कर्नाटक सरकारने गणेशोत्सव आठवडाभरावर असताना निर्णय जाहीर केला. यामुळे वर्षभर तयार केलेल्या मोठय़ा गणेशमूर्ती यावषी तशाच राहिल्या. कोरोनामुळे आम्ही प्रशासनाचे ऐकले आणि लहान गणेशमूर्ती मंडळांना उपलब्ध करून दिल्या. परंतु आता प्रशासनानेही आमचे ऐकावे आणि आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी बेळगावमधील मूर्तिकारांमधून होत आहे.
विनायक मनोहर पाटील (मूर्तिकार, भांदूर गल्ली)
आमच्याकडील सहा सार्वजनिक गणेशमूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. प्रशासनाने आयत्यावेळी निर्णय जाहीर केल्यामुळे मंडळांनी पुढील वषी या मूर्ती घेऊन जाऊ, असे सांगितले. परंतु यामुळे आम्ही अडचणीत सापडलो आहोत. वर्षभर केलेली आमची मेहनत वाया गेली असून, केलेला आर्थिक खर्चही निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
विनायक जोतिबा पाटील (मूर्तिकार, अनगोळ)
यावषी उशिरा निर्णय जाहीर झाल्यामुळे आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आमच्याकडील 18 मोठय़ा सार्वजनिक मूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. या मूर्तींवरील खर्च मोठा असून, तो कसा भरून काढणार असा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.