नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकाऱयाच्या नियुक्तीचे संकेत
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावला दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. धोका थोपविण्यासाठी राबविण्यात येणाऱया सरकारी यंत्रणेतील बेबनावामुळे रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असून ही गोष्ट लक्षात आल्यानेच राज्य सरकारने विशेष प्रशासकीय अधिकाऱयाची नियुक्ती करण्याचे संकेत दिले आहेत.
बुधवारी सायंकाळी आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार आतापर्यंत 19 जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. कुडची, हिरेबागेवाडी हॉटस्पॉट ठरत आहेत. पिरनवाडीतही कोरोनाचा धोका अधिक गडद झाला आहे. सरकारी यंत्रणेतील बेबनावामुळे स्थिती आणखीनच बिघडत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी हे सध्या आपल्यापरीने परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. मात्र, बेळगावसह कर्नाटकातील 8 जिल्हे केंद्र सरकारने हॉटस्पॉट घोषित केले आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन बेळगाव येथील शासकीय यंत्रणेमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱयाची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
आर. विशाल यांचे नाव चर्चेत
गेल्या निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी म्हणून बेळगावात सेवा बजावलेल्या आर. विशाल यांचे नाव यासाठी चर्चेत आहे. एक-दोन दिवसात यासंबंधी अधिकृत आदेश जारी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कारण कोरोना थोपविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा एकत्रितपणे काम केल्या नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.
ज्या संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे, तेथील बेबनावामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून पोलीस, आरोग्य, महसूल, बिम्स आदी सरकारच्या विविध विभागांनी एकत्रितपणे समन्वयाने काम केले तरच कोरोना थोपविणे शक्मय होणार आहे.
178 अहवालांची प्रतीक्षा
बुधवारी रात्री जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये जिल्हय़ाचा सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. एकूण 572 जणांचे स्वॅब जमविण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. 375 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 19 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाला आणखी 178 अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील 1873 जणांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले असून 58 जणांना विलगीकरण कक्षात ठेवून उपचार करण्यात येत आहेत.