विमानाने पाठविण्याची व्यवस्था : आरोग्य यंत्रणा सज्ज
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारने दोन टप्प्यात राबविलेली ड्राय रन (रंगीत तालीम) मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता लसीकरणाला प्रत्यक्षात केव्हापासून सुरुवात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बेळगाव जिल्हय़ाला लसींचे 4 लाख डोस पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी 11 जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. कोरोना लसीकरणासंबंधीच्या तयारीविषयी पंतप्रधान चर्चा करणार आहेत. त्यानंतर मकर संक्रातीपासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्मयता आहे.
पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या अशा 28 हजारांहून अधिक कोरोना योद्धय़ांना लस देण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला आरोग्य खात्याचे पत्र आले असून बेळगावला 4 लाख लसींचे डोस देणार असल्याचा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
बेळगावसाठी 28 हजार जणांना पहिल्या टप्प्यात लस आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात 4 लाख लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन लसींना परवानगी दिली आहे. बेळगावला प्रत्यक्षात कोणती लस येणार याचा उलगडा झाला नसला तरी दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आरोग्य विभागाकडून आवश्यक तयारी पूर्ण
उपलब्ध माहितीनुसार आरोग्य विभागाने यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली आहे. सोमवारनंतर कोणत्याही दिवशी विमानाने लस बेळगावात येणार आहे. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर हे कर्नाटकातील लसीकरणासंबंधीच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. पुढच्या आठवडय़ात मकर संक्रातीआधीच लस बेळगावात पोहोचण्याची शक्मयता आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत 4 लाख 18 हजारहून अधिक जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 83 हजार 950 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांची संख्या कमी होत चालली आहे. अद्याप 5 हजार 269 अहवालांची प्रतीक्षा आहे. शनिवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जिल्हय़ातील सक्रिय रुग्णांची संख्या 167 इतकी आहे.
शनिवारी 23 नवे रुग्ण
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी बेळगाव शहर व जिल्हय़ात 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये काही शिक्षक व आरोग्य कर्मचाऱयांचाही समावेश आहे. हुदली, उचगाव, अशोकनगर, अनगोळ, सदाशिवनगर, मारुती गल्ली, बॉक्साईट रोड, श्रीनगर, महांतेशनगर, बसवणकुडची, वडगाव, टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव तालुक्मयात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 402 वर पोहोचली असून त्यापैकी 25 हजार 893 जणांनी कोरोनावर मात केली आहे.