प्रतिनिधी/ बेळगाव
शुक्रवारी रात्री राज्यातील 36 हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बेळगावमधील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये काकती व महिला पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
काकतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजगली यांची गुप्तचर विभागात बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राघवेंद्र हळ्ळूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महिला पोलीस स्थानकाच्या श्रीदेवी पाटील यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर गुरुनाथ आय. एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.