प्रतिनिधी / बेळगाव
फॅशनव्या बाय फॅशनिस्टा हे पुरस्कारप्राप्त फॅशन व लाईफस्टाईल प्रदर्शन बेळगाव येथील केएलई कन्व्हेन्शन सेंटर येथे प्रशस्त मोकळय़ा जागेत शुक्रवार दि. 17 व शनिवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन वेडिंग स्पेशल आहे. म्हणजेच लग्नसराईच्या मोसमात खास करून महिलावर्गासाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
या प्रदर्शनात देशभरातील नामांकित डिझायनर्स आपल्या अनुपम साहित्यासह उपस्थित असतील. कपडे, कॉस्मेटिक्स, दागिने, ऍक्सेसरीज, होम डेकोरच्या (सजावट)वस्तू असे अनेक प्रकार खरेदीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या वस्तू इतरत्र सहजपणे मिळणार नाहीत.
फॅशनिस्टा प्रदर्शनाची सुरुवात 2008 साली प्रसिद्ध हिंदी चित्रपट व टीव्ही अभिनेते पवन शंकर व त्यांच्या सुविद्य पत्नी युक्ती शंकर यांनी केली. आजतागायत तब्बल 27 शहरांमध्ये ही प्रदर्शने भरवण्यात आली असून सुमारे 10 लाख लोकांनी उपस्थिती दर्शविली आहे.
बेळगाव येथे यापूर्वी दोन वेळा यशस्वी ठरल्यानंतर लोकाग्रहास्तव तिसऱयांदा हे प्रदर्शन भरवले जात आहे. यावेळी कोविडचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जाणार
आहेत.