प्रतिनिधी/ बेळगाव
संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना सोमवार दि. 1 जून रोजी सकाळी 10 वा. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक अंतर पाळून सिमावासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
यावषी संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे लोन आता बेळगाव तालुक्मयातही पसरले आहे. तुरमुरी, कंग्राळी, हंदिगनूर, अगसगा, म्हाळेनट्टी या गावांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे हुतात्म्यांना अभिवादन करताना सामाजिक अंतर व मास्क वापरणे गरजेचे आहे. अभिवादनावेळी गर्दी न करता हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे आवाहन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे व तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी केले आहे.