तबलिग कार्यक्रमातून परतलेल्यांना लागण, शहर-जिल्हय़ात खबरदारी
कॅम्प, बेळगुंदी, हिरेबागेवाडी येथील तिघा जणांना कोरोना
प्रतिनिधी / बेळगाव
दक्षिण दिल्लीतील निजामुद्दीन येथे धर्मसभेच्या निमित्ताने जावून आलेल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. कॅम्प, बेळगुंदी व हिरेबागेवाडी येथील तिघा जणांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. प्रशासनाला आणखी 33 अहवालांची प्रतीक्षा असून ही संख्या वाढण्याचा धोका आहे. बेळगाव शहर व जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.
पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी दुपारी धारवाड येथे या संबंधीची माहिती दिली. सकाळपासूनच सोशल मीडियावर तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र जिल्हा प्रशासनाने यासंबंधी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पालकमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर बेंगळूरहून प्रसार माध्यमांसाठी सरकारकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱया बुलेटिनमध्येही बेळगावचा उल्लेख आहे.
शुक्रवारी राज्यात एकूण 4 स्वॅब तपासणीचे अहवाल पॉझिटिक्ह आले आहेत. बागलकोट येथील एका 75 वषीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर कॅम्प येथील 25 वषीय तरुण, हिरेबागेवाडी येथील 20 वषीय तरुण व बेळगुंदी येथील 70 वषीय वृद्धाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसेलेशन वॉर्डमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
शहरात लॉकडाऊनचे नियम अधिक तीव्र
बेळगाव येथील तिघा जणांनी 13 ते 18 मार्चपर्यंत निजामुद्दिन येथे झालेल्या तबलिगी जमातच्या मरकजमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर ते बेळगावला परतले होते. तपासणी अहवाल उपलब्ध होताच शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्या निवासस्थानी वरि÷ अधिकाऱयांची बैठक झाली. त्यानंतर शहरात लॉकडाऊनचे नियम अधिक तीव्र करण्यात आले.
कुटुंबीयांनाही हलविले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये
बेळगुंदी, हिरेबागेवाडी परिसरात दवंडी पिटवून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले. पोलीस व आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांनी कोरोनाची लागण झालेल्या तिघा जणांच्या कुटुंबीयांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. बेळगुंदी येथील वृद्धाच्या कुटुंबातील सहा जण, कॅम्प येथील तरुणाची आई व बहीण यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. हिरेबागेवाडी येथील तरुणाच्या नातेवाईकांचीही तपासणी करण्यात आली आहे.
प्रशासनालाही बसला धक्का
बेळगावातून 27 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोग शाळेला पाठविण्यात आले होते. ते निगेटिव्ह आल्याने बेळगावकरांत समाधानाचे वातावरण होते. संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त असताना आपल्या गावात मात्र अद्याप याचा शिरकाव झाला नाही, अशी समजूत होती. पोलीस, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, बिम्स्चे अधिकारी बेळगावला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी झटत होते. मात्र शुक्रवारी आलेल्या अहवालामुळे प्रशासनालाही धक्काच बसला आहे.
बेळगावातही धास्ती वाढली
मरकजहून परतलेल्या 62 जणांची वैद्यकीय तपासणी करुन यापैकी 33 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यासंबंधीचा अहवाल अद्याप उपलब्ध झाला नाही. दिल्लीहून परतलेल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याने आता बेळगावातही धास्ती वाढली आहे. शहरात कीटकनाशक फवारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
माहिती थेट बेंगळूरहून
यासंबंधी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी अधिकृत घोषणा करणार अशी अपेक्षा होती. मात्र यापुढे कोणत्याही जिल्हाधिकाऱयांनी कोरोना पॉझिटिक्ह अहवालासंबंधी माहिती देवू नये, यासंबंधीची माहिती थेट बेंगळूरहून मीडिया बुलेटिन जारी करुन देण्यात येईल, अशी सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी दिल्याने जिल्हाधिकाऱयांनी यासंबंधीची घोषणा केली नाही, असे माहिती खात्याच्यावतीने कळविण्यात आले.
फ्लु कॉर्नरमध्ये तपासणी
कोरोनाची लागण झालेल्या तिघा जणांच्या कुटुंबीयांना 108 रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. पोलीस व आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी त्यांना सरसकट सिव्हिलला आणले होते. मात्र आयएमए हॉलमधील फ्लु कॉर्नरमध्ये त्यांचे स्क्रिनिंग करुन ज्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशानाच दाखल करुन घेण्यात येत होते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
लॉकडाऊन अधिक कडक
तिघा जणांचे अहवाल पॉझिटिक्ह येताच पोलीस अधिकाऱयांनी लॉकडाऊनचे नियम अधिक कडक केले. दुपारी प्रमुख मार्गावर बॅरिकेड्स उभे करुन वाहन चालकांना परत पाठविण्याचा सपाटा सुरू करण्यात आला. शनिवारपासून लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे फिरणे टाळावे. अनेक ठिकाणी वाहने अडविणाऱया पोलिसांबरोबर वादावादीचे प्रसंग घडू लागले आहेत. सध्या बेळगाव शहरातील नाजूक परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाशी सहकार्य करणे गरजेचे आहे.
जिल्हय़ात 718 जणांवर नजर
तबलिग कार्यक्रमातून परतलेल्या बेळगाव जिल्हय़ातील नागरिकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरुच ठेवले आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने आतापर्यंत 718 जणांवर नजर ठेवली आहे. तर 175 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दिल्लीहून परतलेल्या 33 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर 420 जणांची 14 दिवसांची होम क्वारंटाईनची मुदत संपली आहे. तर 90 जणांनी 28 दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण केले आहे.
60 सॅम्पल तपासणीसाठी
आरोग्य विभागाने आतापर्यंत एकूण 60 सॅम्पल तपासणीसाठी बेंगळूर व शिमोग्याला पाठविले आहेत. यापैकी 27 जणांचे सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. तीन पॉझिटिक्ह आले असून अद्याप 30 जणांचा अहवाल यायचा आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व्यापक खबरदारी घेण्यात आली आहे. आता तीन सॅम्पल पॉझिटिक्ह आल्याने काटेकोरपणे लॉकडाऊनचे नियम पाळले तरच कोरोना आटोक्मयात येणार आहे.