प्रतिनिधी /बेळगाव
शहर व परिसरात शुक्रवारी तीन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. व्हॅक्सिन डेपो येथे आग लागून गवत व झाडांचे नुकसान झाले. तर जुने बेळगाव येथे गवतगंजीला आग लागून 70 ते 80 हजारांचे नुकसान झाले. तसेच काकतीनजीक महामार्गाला लागून गवताला आग लागण्याची घटना घडली.
सकाळी 7 वाजता व्हॅक्सिन डेपो येथे आग लागली. गवतासोबत तोडलेली झाडेही जळाली. आगीचा भडका पाहून मॉर्निंग वॉकसाठी येणाऱया नागरिकांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. घटनास्थळी पोहचत जवानांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीत झाडांसह वन्यसंपदेचे नुकसान झाले.
जुने बेळगावात गवताला आग
कुलकर्णी गल्ली, जुने बेळगाव येथील यल्लाप्पा गौंडाडकर यांच्या गवतगंजीला व जोंधळय़ाच्या कडब्याला दुपारी आग लागली. अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्मयात आणली. परंतु 2 ट्रॉली गवत व कडबा असे 70 ते 80 हजाराचे नुकसान झाले.
काकतीनजीक महामार्गाशेजारी कचऱयाला अज्ञातांनी आग लावली. ही आग भडकल्याने आजूबाजूच्या गवतानेही पेट घेतला. अग्निशमनचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत गवत जळून मोठे नुकसान झाले.